ushadhere
देवडीफाटा येथे माता पालक पाककला स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून उपस्थिती
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेत्या शाळेत ११ मार्च २०२४ रोजी महिला दिन आयोजित करण्यात आला होता. त्या अनषंगाने शाळेत माता पालकांसाठी शाळेने विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या.पाककला स्पर्धा,खेळ यासारखे उपक्रम आयोजित केले होते.या प्रसंगी ढेकणमोहा शाळेच्या मुख्याध्यापिका,आदर्श शिक्षिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांना शाळेचे मुख्याध्यापक … Read more
विभागीय समन्वयक यांचा ढेकणमोहा मातांशी थेट संवाद
बीड:-आज दि.९/३/२४ रोजी निपुण महाराष्ट्र चे विभागीय समन्वयक श्री हाकाळे साहेब यांनी ढेकणमोहा माता पालक यांच्याशी मुलांच्या प्रगती विषयी चर्चा केली.बीड जिल्ह्यातून पायलट प्रोजेक्टसाठी दोन शाळा निवडलेल्या आहेत.त्यापैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा एक. त्या प्रॉजेक्ट अंतर्गत ऑगस्ट २०२३ मध्ये १ ली ते ३ रीच्या विद्यार्थ्यांची भावनिक,मानसिक,बौध्दीक,शारीरिक अश्या वेगवेगळ्या विकासावर आधारित विभागीय समन्वयक हाकाळे साहेब … Read more
महिला दिनानिमित्त उषा ढेरे यांना नारीशक्ती सन्मान
आज ८ मार्च २०२४ महिला दिनानिमित्त उत्सव महिला दिनाचा Deals Of Arya यांच्याकडून कर्तृत्ववान महिला म्हणून नारीशक्ती सन्मान 2024,शाल,पुष्प,प्रमाणपत्र आणि टिफीन देऊन सपतिक सन्मानित करण्यात आले.. या प्रसंगी उषा ढेरे मॅडम यांनी त्यांची स्वलिखित कविता तू स्वयंसिध्दा… सादर केली.मॅडमच्या उत्कृष्ट शैक्षणिक,साहित्यिक,सामाजिक कार्याबद्दल केलेला हा गौरव आहे.असे आयोजकांनी सांगितले.उपस्थित अनेकांनी मॅडमच्या कार्याचे भरभरून कौतुक आणि … Read more
तू स्वयंसिध्दा…..
✍️८ मार्च महिला दिनाच्या माझ्या सर्व महिलांना भगिनींना समर्पित..✍️. तू स्वयंसिध्दा….✍️ छाटले पंख तुझे जरी डगमगली ना कधी कुणा, कधी रडलीस,कधी लढलीस सिध्द करण्या,उठलीस पुन्हा…||१|| नव्हतीस तू तुझी ना माहिती तू तुला, डोकावलेस आत जेंव्हा कस्तुरी गवसली तुला…||२|| खेचण्या मागे कितीही दिसले तुला जरी, ना थांबली पुन्हा कधी ना मागे पाहिले वळून तरी…||३|| चालताना तू … Read more
ढेकणमोहा शाळा,तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित
सलाम बॉम्बे फाउंडेशन कडून गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक शाळा तंबाखुमुक्त शाळा करण्यासाठी काही निकष ठरवून दिले आहेत.त्यामध्ये एकूण ९ निकषांचा समावेश आहे.यामध्ये विविध मुद्यांच्या आधारे हे निकष पडताळणी केली जाते.त्यामध्ये प्रत्यक्ष त्या त्या मुद्द्याची सत्यता प्रत्यक्ष दर्शी पडताळण्यासाठी त्या निकषावर आधारित फोटो अपलोड करावे लागतात.तो पुरावा योग्य असेल तर तो निकष पूर्ण झाला असे ऑनलाईन … Read more
FLN च्या विभागीय समन्वयक यांची झेड.पी.शाळेला भेट
आज दि.४/३/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड येथे निपुण महाराष्ट्र चे विभागीय समन्वयक आदरणीय नारायण हाकाळे साहेब आणि अजय इंगळे साहेब यांनी शाळेला भेट दिली.भेटीदरम्यान पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर आधारित १ ली ते ३रीच्या विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ पद्घतीने प्रत्येक विद्यार्थ्यांची लेखी,तोंडी,प्रात्यक्षिक स्वरूपात परीक्षा घेतली.यामध्ये विद्यार्थ्याना चित्र रंगवणे,गोष्ट ऐकून चित्र काढणे,संख्या वाचन,संख्या लेखन,बेरीज,वजाबाकी ,चित्र क्रमाने … Read more
SCERT, पुणे च्या शिक्षणगाथा त्रैमासिकमध्ये बीडच्या लेखणीचा सन्मान
SCERT, पुणे बालभारती येथून दर तीन महिन्याला प्रसिध्द होणारे त्रैमासिक शिक्षणगाथा यामध्ये बीडच्या उपक्रमशील, तंत्रस्नेही, आदर्श शिक्षिका,उत्तम लेखिका, संवेदनशील कवयित्री आदरणीय उषा बप्पासाहेब ढेरे यांचा स्वानुभव असणाऱ्या सुंदर लेखाची संपादक साहेबांनी दखल घेऊन उत्कृष्ट मासिकामध्ये स्थान दिले.खरोखर मॅडम हा अनुभव प्रत्येकाने वाचवा असाच आहे. प्रत्येक मुल हे त्याच्या गतीनं कसं शिकतं,फक्त आपल्याकडे तितका संयम हवा.नक्कीच … Read more
राष्ट्रीय विज्ञान दिन..२८ फेब्रुवारी..
आज २८ फेब्रुवारी म्हणजे डॉ. सी व्ही रमण यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने नेहमीप्रमाणेच मुलांना मी फलकलेखनातून वैज्ञानिक रमण यांचे रेखाटन केले.सकाळी उठल्यापासून आपण विज्ञान कस जगतो ?रोजच्या दैनंदिन जीवनात विज्ञान किती महत्त्वाचे? त्याची वेगवेगळी उदाहरणें मुलांना दिली.काही सहज सोपे प्रयोगही करून दाखवले.मुलांना विज्ञानातील गमतीजमती सांगितल्या.मुलांनीही प्रयोग,कृतीचा आनंद घेतला. हे असेच का? ते तसेच का घडले? … Read more