सर्वात मोठा पुरस्कार!!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड या शाळेतील मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेसाठी एकूण २६ विद्यार्थी बसवण्यात आले होते.त्यापैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यातील ३ री वर्गाचे १० पैकी एकूण ७ विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्याबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाळेकडून सन्मानही करण्यात आला.३ रीचा आदित्य पिसाळ याने ३०० पैकी २०४ गुण मिळवून घवघवीत यश मिळवले.आज अचानक ३ रीचा आदित्य जनार्धन पिसाळ याच्या आई – वडिलांनी थेट घरी येऊन साडी,शाल,पेढे आणून माझ्या घरी सन्मान केला.खरच हीच आपल्या प्रामाणिक कामाची पावती.पालकांनी केलेला हा सन्मान म्हणजे सर्वात मोठा पुरस्कार…याहून मोठा सन्मान काय असणार!! आपल्या पालकांनी आपल्या कामाचं केलेलं हे कौतुक,, हीच खरी कमाई,, हाच खरा आनंद,,,आणि आत्मिक समाधान…सर्वात मोठा पुरस्कार..

Leave a Comment