जीवनातील खरा आनंद

जीवनातील खरा आनंद

 

या भूतलावर प्रत्येक जीव जगण्यासाठी धडपडत असतो आणि ते ही जास्तीत जास्त आनंदाने कसं जगता येईल यासाठी तर अधिकच.त्यातून माणूस म्हंटल की,महत्वकांक्षा आलीच.प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी माणूस महत्त्वकांक्षी होतो आणि कधी कधी अति महत्त्वकांक्षी पोटी जीवनातील खरा आनंद गमावून बसतो.जीवनात खरा आनंद शोधायचा असेल तर प्रत्येक काम मनापासून, प्रामाणिकपणे, सकारात्मकतेने करणे गरजेचे आहे.या सर्व गोष्टींमुळे माणसाच्या अंतर्मनाला शांती अन समाधान मिळते आणि यातून निर्माण होतो तो ‘खरा आनंद’.माणसाला दोन मन आहेत.एक अंतर्मन आणि दुसरे बाह्यमन.कधी कधी दोन मनामुळे माणसाची काम करण्याची द्विधावस्था होते अन काम चुकते.त्यामुळे आनंदावर विरजण पडण्याची दाट शक्यता असते.म्हणून माणसाने हे होऊ नये म्हणून नेहमी अंतरमनाचे ऐकून जीवनाचा खरा आनंद मिळवावा.

 

लेखन:-

श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे/करपे,

सहशिक्षिका,

बीड

मोबाईल ९४२००१५०७८

1 thought on “जीवनातील खरा आनंद”

Leave a Comment