प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
आज दिनांक 21 जून 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड या शाळेत दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांनी जीवनात योग का महत्त्वाचा आहे? त्याचे जीवनातील स्थान,महत्त्व सर्व विद्यार्थ्याना सांगितले.त्यानंतर क्रमाक्रमाने बऱ्याच आसनांची माहिती शाळेतील विद्यार्थ्याना देण्यात आली. प्रात्यक्षिकातून आसनांची ओळख आणि माहिती देण्यात आली. सहशिक्षिका जयभाय मॅडम यांनी मुलांना योगसाधना म्हणजे काय? हे सांगितले.यासाठी सुरुवातीला वॉर्म अप घेऊन ते का करायला हवे हेही मुलांना सांगण्यात आले. वॉर्मअप कृती घेऊन मुलांना आसन करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकरीत्या तयारी करण्यात आली.
सुरुवातीला मुलांना ढेरे मॅडम आणि जायभाय मॅडम यांनी प्रत्येक आसनांची ओळख,त्याचे महत्व सांगून स्वतः प्रत्यक्ष आसन करून दाखवले त्यानंतर प्रत्येक आसन मुलांकडून योग्य पद्धतीने करून घेतले.त्यामध्ये पर्वतासन,ताडासन, वृक्षासन,वक्रासन,गोमुखासन, पादहस्तासन,भुजंगासन,वज्रासन, पदमासन,शलभासन,उष्ट्रासन, कपालाभाती,भ्रामरी प्राणायाम,ओमकार… अशा वेगवेगळ्या आसनांचा समावेश होता.प्रत्येक आसनाचा शरीराला काय फायदा होतो?ते किती वेळ केले पाहिजे?त्या आसनाची शारीरिक स्थिती कशी असली पाहिजे ? याबद्दल सविस्तर अशी माहिती देऊन दररोज नियमितपणे आसन का केले पाहिजे?नियमित योग केल्याने आपण आपले शरीर निरोगी ठेवायला कशी मदत करू शकतो हे विदयार्थ्यांना सांगितले तसेच प्रत्येक आसन कधी करायला हवे हेही सांगण्यात आले.
सर्व आसनांच्या शेवटी शवासन करून आसनांचा समारोप करण्यात आला.
Nice💐👍
Hey people!!!!!
Good mood and good luck to everyone!!!!!