आणि तो पहिल्याच दिवशी विनर ठरला…..

विराज अविनाश होंडरे हा विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथे चौथीपर्यंत शिकून आता तो पाचवीला शिकण्यासाठी आई वडिलांसोबत पुण्याच्या नामांकित शाळेत गेला आहे. तसं मागील दोन वर्षां पूर्वीपासूनच वडील एकटेच पुण्यामध्ये कंपनीत नोकरीला राहिले.इथले शिक्षण गुणवत्ता पूर्ण असल्यामुळे त्यांना मुलांना घेऊन जावे असे वाटले नाही. म्हणून दोन मुलं आणि आई यांना इकडेच गावाकडे ठेवून स्वतः एकट्याने दोन वर्ष पुण्यामध्ये काढली.पण आता इथली ही शाळा चौथीपर्यंतच असल्यामुळे त्यांनी त्यांचे घर पुण्याला शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. इथे मराठी शाळेत शिकल्यामुळे त्याला पाचवी सेमीसाठी शाळेने आधी प्रवेश नाकारला.त्याच्या वडिलांनी फोन केला मॅडम आपल्याला सेमी साठी ऍडमिशन मिळत नाही काय करावे? त्यांना सांगितलं तेथे प्रिन्सिपल यांना विनंती करा त्याची प्रगती अगोदर बघा योग्य वाटत असेल तरच घ्या,नाहीतर घेऊ नका. तसं विराजच्या वडिलांनी प्राचार्यांना विनंती केली की,त्याची आधी प्रगती बघा,नंतरच त्याला ऍडमिशन द्या.जर तो तुमच्या एंट्रन्स परीक्षेमध्ये पास नाही झाला तर तुम्ही विराजला ऍडमिशन देऊ नका.अशी विनवणी केल्यानंतर त्याची परीक्षा घेण्यात आली आणि तो त्या परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी पास झाला.तिथे आपल्या जिल्हा परिषद शाळेचे तेथील प्राचार्य यांनी खूप कौतुक केले आणि त्याला ऍडमिशन मिळाले. काल शाळेचा पहिला दिवस होता.माझा विराज शाळेमध्ये गेला होता.आज त्याच्यासाठी शाळा,वर्गमित्र,बाई,परिसर सगळंच काही नवीन होतं.तरीही तो धीटपणे शाळेमध्ये गेला.वर्गात गेल्यानंतर वर्गात 55 विद्यार्थी होते.वर्गात मॅडमने सर्वांना पाढे,इंग्रजी स्पेलिंग आणि बरच काही विचारलं.विराजने अगदी धीटपणे उत्तरे दिली आणि तो 55 विद्यार्थ्यांमधून पहिला आला,पहिल्याच दिवशी तो वर्गामध्ये एक नंबरचा विनर ठरला.ही प्रगती फक्त जिल्हा परिषद शाळेतच आहे,हे सगळं मला विराज आणि विमल त्याची आई यांनी फोन करून सांगितलं. घरी आल्या आल्या विराज आईला म्हणाला,मी पहिला आलो हे आधी मॅडला सांग.शाळेतून वाटेतून घरी येत असतानाच विराज आणि त्याच्या आईचा फोन आला खूप वेळ बोलत होते.खूप खूश होता आणि आनंदी सुद्धा.हे यश आहे आपल्या जिल्हा परिषद शाळेचे.हा आत्मविश्वास आहे ग्रामीण भागातील सरकारी शाळेचे. हे यश आहे आपल्या खडतर प्रवासातून शाळा उभी करणाऱ्या शिक्षकाचे. हे यश आहे कठीण परिस्थितीत सुद्धा विद्यार्थी घडविण्याचा वसा घेतलेल्या शिक्षकाचे. हा आत्मविश्वास फक्त जिल्हा परिषद शाळेतच मुलांमध्ये येतो कारण तिथेच त्याचा सर्वांगीण विकास होतो.आपल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी फार मोठी आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची सुद्धा….

1 thought on “आणि तो पहिल्याच दिवशी विनर ठरला…..”

Leave a Comment