सर्वात मोठा पुरस्कार!!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड या शाळेतील मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेसाठी एकूण २६ विद्यार्थी बसवण्यात आले होते.त्यापैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यातील ३ री वर्गाचे १० पैकी एकूण ७ विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्याबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाळेकडून सन्मानही करण्यात आला.३ रीचा आदित्य पिसाळ याने ३०० पैकी २०४ गुण मिळवून घवघवीत यश मिळवले.आज अचानक … Read more

“नारीशक्ती फिटनेस रन” आयोजित धावणे स्पर्धेत उषा ढेरे प्रथम

  ८ मार्च २०२४,महिला दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र,बीड आयोजित “नारीशक्ती फिटनेस रन” कार्यक्रमाअंतर्गत छञपती संभाजी महाराज क्रीडांगण,बीड येथे घेतलेल्या ‘ धावणे ‘ या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देवून सन्मानित…

देवडीफाटा येथे माता पालक पाककला स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून उपस्थिती

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेत्या शाळेत ११ मार्च २०२४ रोजी महिला दिन आयोजित करण्यात आला होता. त्या अनषंगाने शाळेत माता पालकांसाठी शाळेने विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या.पाककला स्पर्धा,खेळ यासारखे उपक्रम आयोजित केले होते.या प्रसंगी ढेकणमोहा शाळेच्या मुख्याध्यापिका,आदर्श शिक्षिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांना शाळेचे मुख्याध्यापक … Read more

महिला दिनानिमित्त उषा ढेरे यांना नारीशक्ती सन्मान

  आज ८ मार्च २०२४ महिला दिनानिमित्त उत्सव महिला दिनाचा Deals Of Arya यांच्याकडून कर्तृत्ववान महिला म्हणून नारीशक्ती सन्मान 2024,शाल,पुष्प,प्रमाणपत्र आणि टिफीन देऊन सपतिक सन्मानित करण्यात आले.. या प्रसंगी उषा ढेरे मॅडम यांनी त्यांची स्वलिखित कविता  तू स्वयंसिध्दा… सादर केली.मॅडमच्या उत्कृष्ट शैक्षणिक,साहित्यिक,सामाजिक कार्याबद्दल केलेला हा गौरव आहे.असे आयोजकांनी सांगितले.उपस्थित अनेकांनी मॅडमच्या कार्याचे भरभरून कौतुक आणि … Read more