ढेकणमोहा बुथवरील पाळणाघर

ढेकणमोहा बुथवर सजले पाळणाघर

 

आज दि.१३/४/२४ रोजी बीड जिल्ह्यात लोकसभेसाठी इलेक्शन झाले. त्यासाठी उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येक मतदान बुथवरती लहान बाळांसाठी पाळणाघर तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. लहान मुलांचा उन्हामुळे होणारा त्रास टळावा. महिला मतदारांच्या लहान मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची छान प्रकारे काळजी घेतली जावी.यासाठी ही सुंदर व्यवस्था करण्याचे सांगितले गेले होते. या पाळणा घरामध्ये बाळासाठी खेळणी,खाऊ,रंगीबिरंगी वेगवेगळ्या खेळण्या,फुगे अशा विविध वस्तू वापरून पाळणाघर तयार करण्यासाठी वापरता येणार होते. या आदेशाचे पालन प्रत्येक बुथवर केले गेले, त्याच आदेशाचे पालन म्हणून बीड तालुक्यातील ढेकणमोहा बुथवर अंगणवाडी कार्यकर्ती,सेविका मदतनीस यांनी सर्वांनी मिळून अतिशय सुंदर असे पाळणाघर मतदानाच्या आदल्या दिवशीच तयार केले गेले होते.यामध्ये बाळाच्या मनोरंजनासाठी रंगीबेरंगी वस्तू,फुगे, वेगवेगळ्या फुलांच्या माळा,विविध खेळण्या मांडण्यात आल्या होत्या. बुथवर येणाऱ्या प्रत्येक महिला मतदाराच्या बाळाला आनंद देण्यासाठी या सर्वजणी अगदी मनापासून धडपडत होत्या.बाळाला खाऊ घालणे,झोका देणे,बाळासाठी अंगाई गीत गाऊन त्याला झोपू घालणे,छोट्या सायकलवरून फिरवणे त्याच्याशी गप्पा मारणे,त्याला हसवणे, बाळ रडू नये,ते सतत हसत राहून आनंदी रहावे यासाठी सतत सर्व ताई आनंदाने काम करत होत्या.या पाळणाघरामुळे येणाऱ्या मतदार महिलेच्या प्रत्येक लहान बाळाची अगदी छान काळजी घेताना दिसून येत होती.यावर्षीच्या बुथवरील या पाळणाघराचे सर्वानाच अप्रूप वाटत होते.येणाऱ्या प्रत्येक मतदार महिलेची आणि तिच्या बाळाची अगदी छान सोय झाली होती.या पाळणाघरासाठी या सर्व अंगणवाडी ताईंना सुपरवायझर मॅडम, बुथ लेव्हल ऑफिसर BLO श्रीमती उषा ढेरे मॅडम आणि भारत राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले.

या पाळणाघरासाठी अंगणवाडी ताई लता थापडे,जान्हवी गाडीवान,अनिता देवकते,समिंद्रा ननावरे,आशा राठोड,शुभांगी शिंदे,अनिता देवकते, सुवर्णा थापडे,अनिता मसवले,यांनी परिश्रम घेतले.त्यांच्या या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment