अनोखे वृक्षाबंधन

अनोखे वृक्षाबंधन.. श्रावण महिना म्हटलं की सणावारांची अगदी रेलचेल असते. आपण अगदी कुठेही असो, सण आपण अगदी मनापासून आनंदाने साजरे करतो. आणि ते जर वेगळ्या पद्धतीने केले तर त्याचा आनंदही तितकाच वेगळा आणि समाधानकारक असतो.अगदी तसाच हा श्रावण महिन्यात येणारा, बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा,रेशीम धाग्याने बांधलेला हा रक्षाबंधन सण. घरोघरी हा सण मोठ्या उत्साहाने आनंदाने … Read more

आणि तो पहिल्याच दिवशी विनर ठरला…..

विराज अविनाश होंडरे हा विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथे चौथीपर्यंत शिकून आता तो पाचवीला शिकण्यासाठी आई वडिलांसोबत पुण्याच्या नामांकित शाळेत गेला आहे. तसं मागील दोन वर्षां पूर्वीपासूनच वडील एकटेच पुण्यामध्ये कंपनीत नोकरीला राहिले.इथले शिक्षण गुणवत्ता पूर्ण असल्यामुळे त्यांना मुलांना घेऊन जावे असे वाटले नाही. म्हणून दोन मुलं आणि आई यांना इकडेच गावाकडे ठेवून … Read more

उषाच्या उपक्रमाची जादू, जिथे मुले लागली नांदू.

2018 सालची गोष्ट. कधीच न ऐकलेल्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या. त्या प्रत्यक्ष 2018 साली झाल्या आणि हेच वर्ष माझ्या आयुष्यातील कायम आठवणीतील वर्ष.हो, आठवणीतीलच म्हणायचं. आज पर्यंत झालेल्या नोकरीच्या काळामध्ये शाळा म्हणजे मुलांचा मेळा आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचा तयार केलेला मळा एवढेच माहिती. पण ऑनलाईन बदलीने मिळालेल्या शाळेमध्ये मुलांचा मेळाच नव्हता तर उपक्रमांच्या मळ्याचा प्रश्नच नव्हता. … Read more

शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांचे शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन

दिनांक 30 एप्रिल 2025 अचानक बीईओ कार्यालय,बीड येथून सकाळी साडेअकरा वाजता फोन येतो.मॅडम,तुम्हाला दुपारी दोन वाजेपर्यंत छत्रपती संभाजी नगरला जायचे आहे. मुलं वर्गाबाहेर खेळत होती.घाई घाईने मुलांना,मला लवकर जावे लागेल असं सांगितलं मुलांनीही तितक्याच तत्परतेने खेळाचे सामान व्यवस्थित पॅक करून वर्गामध्ये ठेवलं आणि मी शाळेतून निघाले .बीडला पोहोचेपर्यंत बारा वाजले असतात. आज अक्षय तृतीया असल्यामुळे … Read more

जाणतो तो गुरु..

ही माझी ३ री वर्गात शिकणारी गौरवी… अतिशय प्रामाणिक, हुशार, अभ्यासू आणि सर्वगुणसंपन्न अशी.नियमित वेळेवर दररोज शाळेत हजर असणारी गौरवी काल शाळेत दिसली नाही. ती घरी राहिली त्याला कारणही तसेच असेल हे माझ्या लक्षात आलं कारण ती घरी रहातच नाही.गौरवी शाळेत का बर आली नाही असं मी विचारल्यानंतर मला कळालं की तिची आई आजारी होती … Read more

पालकांनो..मुलांना खेळू द्या,कळ्याना उमलू द्या….

“सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय?शाळेभोवती तळे साचूनसुट्टी मिळेल काय..?”गीताच्या ओळी ऐकून आपण हरकून गेलात. हो,अगदी हरकून जाण्यासारखंच हे गीत आहे. प्रत्येकानं हे पावसाचं गाणं शाळेमध्ये गायलेलं आणि अगदीच पावसामध्ये नाचून सुद्धा त्याचा आनंद घेतलेला आहे. हा…. पण आपल्या पिढीनं..हो,खरच आपल्या बालपणी कोणत्याच गोष्टी दडपणाखाली होत नव्हत्या,होत्या त्या फक्त आनंदाने…..त्या काळात खूप छान रमतगमत,वाटेल तेंव्हा शाळेत … Read more