ढेकणमोहा शाळेत साजरा झाला झाडांचा वाढदिवस..

प्राथमिक शाळा ढेकणमोहा,येथे साजरा झाला झाडांचा वाढदिवस….     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड येथे एक जुलै 2024 रोजी माननीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच कृषी दिनानिमित्त शाळेत लावलेल्या झाडांचा आज सहावा वाढदिवस साजरा करण्यात आला. आज ढेकनमोहा शाळेत मुलांमध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसून येत होता.सकाळपासूनच एक वेगळीच लगबग चिमुकल्यामध्ये दिसत होती.शाळेत आल्या … Read more

ढेकणमोहा शाळेत योगदिन उत्साहात साजरा..

प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा   आज दिनांक 21 जून 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड या शाळेत दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांनी जीवनात योग का महत्त्वाचा आहे? … Read more

राष्ट्रीय विज्ञान दिन..२८ फेब्रुवारी..

आज २८ फेब्रुवारी म्हणजे डॉ. सी व्ही रमण यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने नेहमीप्रमाणेच मुलांना मी फलकलेखनातून वैज्ञानिक रमण यांचे रेखाटन केले.सकाळी उठल्यापासून आपण विज्ञान कस जगतो ?रोजच्या दैनंदिन जीवनात विज्ञान किती महत्त्वाचे? त्याची वेगवेगळी उदाहरणें मुलांना दिली.काही सहज सोपे प्रयोगही करून दाखवले.मुलांना विज्ञानातील गमतीजमती सांगितल्या.मुलांनीही प्रयोग,कृतीचा आनंद घेतला. हे असेच का? ते तसेच का घडले? … Read more

राजभाषा दिनानिमित्त कवी कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन

कवी कुसुमाग्रज जन्मदिन आज २७ फेब्रुवारी, राजभाषा गौरव दिन प्रत्येकजण साजरा करी.. रचना:- उषा ढेरे,बीड कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन.मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार,समीक्षक कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिनी फलकलेखनातून खूप खूप शुभेच्छा…