आषाढी एकादशी…

आस…..   अक्षरांचे टाळ,शब्दांचा निनाद मुखी एकच, ज्ञान-विठ्ठल…||१||   ध्यानी-मनी-स्वप्नी,एकच तो ध्यास कर्म हाच नित्य, विठ्ठल माझा…||२||   मनोभावे पुजा,सदा कर्तव्याची तीच पूर्ण व्हावी,आस विठ्ठला…||३||   मागणे एकच,आज एकादशी सेवा लाभावी,विठ्ठला तुझी…..   अभंग रचना – उष:प्रकाश करपे/ढेरे,बीड

विचारपुष्प -१….

विचारपुष्प ही मालिका मी दररोज नियमित सुरू करत आहे.हे विचार माझे स्वतःचे असणार आहेत.यामध्ये मला आलेले अनुभव,माझे वैयक्तिक विचार असणार आहेत.जे माझ्यासाठी आणि इतरांसाठी सुध्दा तितकेच प्रेरणा देणारे असणार आहेत.स्वतःबरोबरच इतरांनाही या प्रेरणादायी विचारांचा उपयोग व्हावा याच हेतूने ही विचारपुष्प मालिका सुरू करत आहे.ही विचारांची मालिका नक्कीच सर्वांच्या विचारांना चालना आणि प्रेरणा देणारी ठरणार आहे … Read more

जीवनातील खरा आनंद

जीवनातील खरा आनंद   या भूतलावर प्रत्येक जीव जगण्यासाठी धडपडत असतो आणि ते ही जास्तीत जास्त आनंदाने कसं जगता येईल यासाठी तर अधिकच.त्यातून माणूस म्हंटल की,महत्वकांक्षा आलीच.प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी माणूस महत्त्वकांक्षी होतो आणि कधी कधी अति महत्त्वकांक्षी पोटी जीवनातील खरा आनंद गमावून बसतो.जीवनात खरा आनंद शोधायचा असेल तर प्रत्येक काम मनापासून, प्रामाणिकपणे, सकारात्मकतेने करणे … Read more

बालपण

बालपण लहानपणी मोठं व्हायची हौस असते भारी कुणीही मोठं दिसलं की मजा वाटते न्यारी…👌 ऐट मिरवतात मोठे सगळे सदा मनात येई, मी मोठा झालो की कित्ती मजा येईल…😇 होता होता एकदा झालो मी मोठा, वाटले आता आपलाच रुबाब पण मनाचा भ्रम खोटा..🤦‍♀️ काय ते काम अन् काय त्या कटकटी, सगळं सोडवताना नुसता जीव येई मेटाकुटी..😌 … Read more

तू स्वयंसिध्दा…..

✍️८ मार्च महिला दिनाच्या माझ्या सर्व महिलांना भगिनींना समर्पित..✍️. तू स्वयंसिध्दा….✍️ छाटले पंख तुझे जरी डगमगली ना कधी कुणा, कधी रडलीस,कधी लढलीस सिध्द करण्या,उठलीस पुन्हा…||१|| नव्हतीस तू तुझी ना माहिती तू तुला, डोकावलेस आत जेंव्हा कस्तुरी गवसली तुला…||२|| खेचण्या मागे कितीही दिसले तुला जरी, ना थांबली पुन्हा कधी ना मागे पाहिले वळून तरी…||३|| चालताना तू … Read more

राजभाषा दिनानिमित्त कवी कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन

कवी कुसुमाग्रज जन्मदिन आज २७ फेब्रुवारी, राजभाषा गौरव दिन प्रत्येकजण साजरा करी.. रचना:- उषा ढेरे,बीड कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन.मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार,समीक्षक कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिनी फलकलेखनातून खूप खूप शुभेच्छा…