जाणतो तो गुरु..

ही माझी ३ री वर्गात शिकणारी गौरवी… अतिशय प्रामाणिक, हुशार, अभ्यासू आणि सर्वगुणसंपन्न अशी.नियमित वेळेवर दररोज शाळेत हजर असणारी गौरवी काल शाळेत दिसली नाही. ती घरी राहिली त्याला कारणही तसेच असेल हे माझ्या लक्षात आलं कारण ती घरी रहातच नाही.गौरवी शाळेत का बर आली नाही असं मी विचारल्यानंतर मला कळालं की तिची आई आजारी होती … Read more

पालकांनो..मुलांना खेळू द्या,कळ्याना उमलू द्या….

“सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय?शाळेभोवती तळे साचूनसुट्टी मिळेल काय..?”गीताच्या ओळी ऐकून आपण हरकून गेलात. हो,अगदी हरकून जाण्यासारखंच हे गीत आहे. प्रत्येकानं हे पावसाचं गाणं शाळेमध्ये गायलेलं आणि अगदीच पावसामध्ये नाचून सुद्धा त्याचा आनंद घेतलेला आहे. हा…. पण आपल्या पिढीनं..हो,खरच आपल्या बालपणी कोणत्याच गोष्टी दडपणाखाली होत नव्हत्या,होत्या त्या फक्त आनंदाने…..त्या काळात खूप छान रमतगमत,वाटेल तेंव्हा शाळेत … Read more

जिल्हा परिषद ढेकणमोहा शाळेने रचला एक नवा इतिहास….

एकेकाळी ऑक्सिजनवर असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा या शाळेने आज एक नवा इतिहास रचला आहे. सहा वर्षांपूर्वी पहिली ते चौथी वर्गाची एकूण पटसंख्या नाममात्र असणारी ही जिल्हा परिषदेची बीड जिल्ह्यातील शाळा. या शाळेमध्ये चार वर्गाचे एकूण फक्त पाच ते सात विद्यार्थी होते. पुढे पुढे जसजसे शाळेमध्ये विविध उपक्रम होऊ लागले तसतशी दरवर्षी शाळेची विद्यार्थी … Read more

कृतार्थ मी………

हा माझा वर्गातील स्वप्निल…इयत्ता तिसरी वर्गात शिकणारा.तसं पाहिलं तर घरची परिस्थिती बेताचीच. आई-वडील कामानिमित्त काही दिवस बाहेरगावी स्थलांतरित होतात. ठराविक दिवस कामानंतर ते परत गावी येतात. हा त्यात एकुलता एक म्हणजे पर्यायाने लाडका. लाडका नव्हे तर अति लाडकाच. तो म्हणेल तेच आई-वडिलांनी करायचं. आई वडील म्हणतील ते त्यानं करायचं हे कधी घडतच नाही. पहिली,दुसरीत शाळेत … Read more

STAR’S प्रकल्पाअंतर्गत व्हिडिओ निर्मितीमध्ये योगदान संधी

आज 14 जानेवारी…मकरसंक्रांत…. दिन विशेषमाझ्यासाठी विशेष दिन……सगळ्या महिला अगदी सकाळपासूनच वानवसा देण्याला जायची,लगबगीने तयारी करत होत्या.माझी लगबग होती… पाठ घ्यायला जायची…. रस्त्याने जाताना प्रत्येक जणू काही आश्चर्याने पहात होता कारण आज मकर संक्रांत दिनी प्रत्येक महिला वानवसा देण्याच्या तयारीने घराबाहेर पडताना ही महिला मात्र पाठीला लॅपटॉपची बॅग अडकवून कुठे चालली असेल? मला मात्र आजच्या या … Read more

आज कड्यात उषा ढेरे आदर्श शिक्षिका पुरस्काराने होणार सन्मानित…

आष्टी (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते स्व.मैनुद्दीन शेख स्मरणार्थ आदर्श पुरस्कार वितरण तसेच गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळा रविवार दि.१२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीनिमित्त सद्गुरु हॉटेल हॉल धामणगाव रोड, संत मदन महाराज मठासमोर कडा येथे सकाळी १० वा.आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील या उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे संत मदन … Read more

ढेकणमोहा शाळेचे मॅरॅथॉन स्पर्धेत यश..10/11/24

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,ता.जिल्हा बीड ही जिल्हा परिषदेची शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून बीड जिल्ह्यात नावारूपास आली आहे. या शाळेत सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. सातत्याने राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थी कृतिशील बनलेले त्यामुळे शाळेचा इतिहास पाहता मागील सहा वर्षात शाळेचा १ ली ते ४ थी पर्यंतचा एकूण विद्यार्थी पट अगदी 15 पटीपेक्षा जास्त … Read more

ढेकणमोहा शाळेचा अनोखा उपक्रम

एक पाऊल स्वच्छतेकडे,प्राथमिक शाळा ढेकणमोहा या शाळेचा अनोखा उपक्रम.. मुख्याध्यापिकाजिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहाबीड 9420025078