जिल्हा परिषद ढेकणमोहा शाळेने रचला एक नवा इतिहास….

एकेकाळी ऑक्सिजनवर असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा या शाळेने आज एक नवा इतिहास रचला आहे. सहा वर्षांपूर्वी पहिली ते चौथी वर्गाची एकूण पटसंख्या नाममात्र असणारी ही जिल्हा परिषदेची बीड जिल्ह्यातील शाळा. या शाळेमध्ये चार वर्गाचे एकूण फक्त पाच ते सात विद्यार्थी होते. पुढे पुढे जसजसे शाळेमध्ये विविध उपक्रम होऊ लागले तसतशी दरवर्षी शाळेची विद्यार्थी … Read more

कृतार्थ मी………

हा माझा वर्गातील स्वप्निल…इयत्ता तिसरी वर्गात शिकणारा.तसं पाहिलं तर घरची परिस्थिती बेताचीच. आई-वडील कामानिमित्त काही दिवस बाहेरगावी स्थलांतरित होतात. ठराविक दिवस कामानंतर ते परत गावी येतात. हा त्यात एकुलता एक म्हणजे पर्यायाने लाडका. लाडका नव्हे तर अति लाडकाच. तो म्हणेल तेच आई-वडिलांनी करायचं. आई वडील म्हणतील ते त्यानं करायचं हे कधी घडतच नाही. पहिली,दुसरीत शाळेत … Read more

STAR’S प्रकल्पाअंतर्गत व्हिडिओ निर्मितीमध्ये योगदान संधी

आज 14 जानेवारी…मकरसंक्रांत…. दिन विशेषमाझ्यासाठी विशेष दिन……सगळ्या महिला अगदी सकाळपासूनच वानवसा देण्याला जायची,लगबगीने तयारी करत होत्या.माझी लगबग होती… पाठ घ्यायला जायची…. रस्त्याने जाताना प्रत्येक जणू काही आश्चर्याने पहात होता कारण आज मकर संक्रांत दिनी प्रत्येक महिला वानवसा देण्याच्या तयारीने घराबाहेर पडताना ही महिला मात्र पाठीला लॅपटॉपची बॅग अडकवून कुठे चालली असेल? मला मात्र आजच्या या … Read more

आज कड्यात उषा ढेरे आदर्श शिक्षिका पुरस्काराने होणार सन्मानित…

आष्टी (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते स्व.मैनुद्दीन शेख स्मरणार्थ आदर्श पुरस्कार वितरण तसेच गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळा रविवार दि.१२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीनिमित्त सद्गुरु हॉटेल हॉल धामणगाव रोड, संत मदन महाराज मठासमोर कडा येथे सकाळी १० वा.आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील या उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे संत मदन … Read more

ढेकणमोहा शाळेचे मॅरॅथॉन स्पर्धेत यश..10/11/24

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,ता.जिल्हा बीड ही जिल्हा परिषदेची शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून बीड जिल्ह्यात नावारूपास आली आहे. या शाळेत सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. सातत्याने राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थी कृतिशील बनलेले त्यामुळे शाळेचा इतिहास पाहता मागील सहा वर्षात शाळेचा १ ली ते ४ थी पर्यंतचा एकूण विद्यार्थी पट अगदी 15 पटीपेक्षा जास्त … Read more

ढेकणमोहा शाळेचा अनोखा उपक्रम

एक पाऊल स्वच्छतेकडे,प्राथमिक शाळा ढेकणमोहा या शाळेचा अनोखा उपक्रम.. मुख्याध्यापिकाजिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहाबीड 9420025078

निपुण महाराष्ट्रचे विभागीय समन्वयक यांचा ढेकणमोहा माता पालकांशी थेट संवाद..

निपुण महाराष्ट्रचे विभागीय समन्वयक श्री नारायण हाकाळे साहेब यांचा मराठवाडा मुक्ती दिनी ढेकणमोहा माता पालक यांच्याशी थेट संवाद.. आज १७ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेत मराठवाडा मुक्ती दिन अगदी उत्साहात पार पडला.या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निपुण महाराष्ट्रचे विभागीय समन्वयक आदरणीय श्री नारायण हाकाळे साहेब उपस्थित होते.साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात … Read more

१३/९/२४.. आठवणीतील जन्मदिवस..

१३ सप्टेंबर २०२४…आठवणीतील वाढदिवस…. जन्मदिवसाला आपण वाढदिवस म्हणतो खरे पण तस बारकाईने पाहिले तर प्रत्येक वाढदिवसागणिक आपण वयाने मोठं होत जातो आणि जीवनात मिळालेल्या आयुर्मानातील एक वर्ष कमी होत.पण प्रत्येक वाढदिवसाला सर्वांच्या शुभेच्छारुपी आशीर्वादाने आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळत जाते आणि त्यामुळे आपले आयुष्य वाढत असावे म्हणून त्याला वाढदिवस म्हणत असावेत(माझे वैयक्तिक मत). काल माझा … Read more