निपुण महाराष्ट्रचे विभागीय समन्वयक यांचा ढेकणमोहा माता पालकांशी थेट संवाद..

निपुण महाराष्ट्रचे विभागीय समन्वयक श्री नारायण हाकाळे साहेब यांचा मराठवाडा मुक्ती दिनी ढेकणमोहा माता पालक यांच्याशी थेट संवाद..
आज १७ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा शाळेत मराठवाडा मुक्ती दिन अगदी उत्साहात पार पडला.या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निपुण महाराष्ट्रचे विभागीय समन्वयक आदरणीय श्री नारायण हाकाळे साहेब उपस्थित होते.साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन, महाराष्ट्र गीत गायन तसेच मराठवाडा मुक्ती दिनाबद्दल भाषणातून आपापली मते व्यक्त केली.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर हाकाळे साहेबांनी उपस्थित माता पालकांशी थेट संवाद साधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी चर्चा घडवून आणली.fln अंतर्गत इयत्ता १ ली ते ३ री च्या विद्यार्थ्याना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान किती असावं? ते असण्यासाठी माता म्हणून आपण काय केलं पाहिजे? मातांनी मुलांच्या वाचन/लेखन प्रगतीसाठी किती जागरूक असल पाहिजे? त्यासाठी आपण स्वतःला किती अपडेट ठेवलं पाहिजे? मुलांकडे लक्ष द्यायचं म्हणजे नेमकं काय करायला हवं? या आणि अश्या अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली.तसेच fln अंतर्गत ग्रुप वर येणारे आयडिया व्हिडिओ,stroy seccion मधील आठवड्यातील गोष्ट याबाबतही चर्चा केली.मुलांकडून छोट्या छोट्या कृती सहजपणे कशा करून घ्याव्यात.मुलांना हसत खेळत कस सांभाळावं,त्यांना अभ्यासाची गोडी कशी लावावी? हेही छान अनेकविध उदाहरणातून पटवून दिले.मागील तीन वर्षाच्या कालावधीत चालू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा देखील घेतला.साहेबांनी ढेकणमोहा माता पालक गटात चालू असलेल्या कार्याविषयी समाधान व्यक्त करून मॅडम आणि मातांचे कौतुक करून अभिनंदनही केले.मातांचे गटांतील चालू असलेले काम पाहून साहेबांनी समाधान व्यक्त केले. काही बदलही सुचवले. मातांनी मुलांच्या प्रगतीसाठी आवश्यक ती चर्चाही केली. समस्या आणि त्यावर उपाय यावरही चर्चा केली. पहिलीच्या मातांनी आता अधिक सक्रिय होणं आवश्यक आहे असेही हाकाळे साहेबांनी उपस्थित मातांना सांगितले. हाकाळे साहेबांनी विभागात चालू असलेले माता पालकांचे fln अंतर्गत असलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती देवून आपले काम सर्वात युनिक असे आहे, असही साहेब पुढे कौतुकाने म्हणाले.
शेवटी आता यानंतर पुढे मातांनी काय करायचं आहे? आणि काय केलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले आणि बैठकीचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका उषा ढेरे मॅडम,जयभाये मॅडम, गाडीवान सर,पालक आणि माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Comment