- अन् शाळेची घंटा वाजली.
शीर्षक वाचून आपण नक्कीच विचारात पडला असाल की,यामध्ये काय विशेष?शाळा म्हटलं की,घंटी आलीच,अगदी बरोबर! शाळा आणि घंटी या दोन्ही बाबी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटल तरी वावग ठरणार नाही.जिथे शाळा तिथे घंटी.अगदी शालेय जीवनापासून घंटी वाजली की शाळेत जाणं हे जणू सूत्रच आपलं.पण खरच आश्चर्य म्हणजे माझ्या शाळेत मी २०१८ ला रुजू झाले अगदी तेंव्हापासून शाळेला घंटी नाही अगोदर होती की नाही माहीत नाही.की,त्याचा घणघण असा छान आवाजही नाही.कदाचित घंटीची तेंव्हा गरजच भासली नसावी.कारण मुलं जेमतेम पाच ते सात.
पुढे शाळेत एकूण 30 विद्यार्थी झाले.शाळेत येतानाच पाहिलं की,मुलं धावतच शाळेकडे यायची. प्रत्येकालाच जणू बोलावण पाठवलं आहे असंच वेळेत शाळेत हजर व्हायची. पुढे पुढे दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढतच गेली.ऑफिसची खिडकी उघडी दिसली की,मुलं शाळेकडं धावत यायची.जणू काही खिडकीनेच मुलांना शाळेकडे बोलावलं असं कधीकधी वाटायचं.मुलांना,मॅडम आल्या,असं जणू उघडी खिडकीच सांगायची.मुलं स्वतः धावत यायची आणि सर्वांनाच,मॅडम आल्या,मॅडम आल्या,असं म्हणतच शाळेकडे पळत सुटायची.आजपर्यंत दरवर्षी शाळेची विद्यार्थी संख्या ही वाढतच गेली होती. यावर्षी म्हणजे 2024 मध्ये माझ्या शाळेत एकूण पहिली ते चौथी वर्गाची एकूण 83 विद्यार्थी संख्या झाली आहे. बरेच विद्यार्थी दोन ते तीन किलोमीटर पासून चालत शाळेत येतात. वयोगट लहान असल्याने मुलांना शाळेची वेळ लक्षात राहत नाही.सकाळ झाली की, शाळेकडे निघण्याची त्यांची लगबग सुरू झालेली असते आणि त्यामुळे मुलं वेळेच्या आधीच खूप लवकर शाळेत येतात.विशेष म्हणजे शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेत हजर असतात म्हणजे शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती शाळेमध्ये असते तेही शाळेची घंटी न वाजताच.यावर्षी विद्यार्थी संख्या भरपूर आहे.शाळेला लांबून वस्ती वरून मुलं शाळेत येतात.घरातून पालक गावात निघाले की,मुलंही शाळेत यायला निघतात.घाई करतात.आताही ऑफिसची खिडकी उघडी दिसली की,मुलं पळतच शाळेकड निघतात.या घाईत मग मुलं उपाशी सुध्दा निघतात. वेळ असूनही एकमेकांच्या सोबतीने जास्त लवकरही निघतात.
सहज मनात आलं, जाणवलं की,आता शाळेला घंटीची गरज आहे.आणि घणघण आवाज करणारी घंटी शाळेसाठी घेऊन आले.जणू काही शाळेच्या भिंतीमध्ये जीव आल्यागत वाटू लागले.शाळेचा श्वासच जणू तिला मिळाला होता,असं वाटत होतं.मला माझी शाळा आठवली आणि मी मोठ्यानं घणघण घंटी वाजवली.खूपच आनंद वाटला.मुलांना तर या घणघण आवाजाने जणू चैतन्यच दिले.त्यांना खूप आनंद आणि उत्सुकता वाटत होती.मुलांना सांगितलं आता शाळेला यायचं ते घंटी वाजल्यानंतरच! शाळेत यायचं,तेही घाई न करता,छान आवरून,तयार होऊन आणि पोटभर जेवण करून.खरच माहीत नाही आज माझ्या शाळेने किती वर्षानंतर घंटीचा छान असा घणघण आवाज ऐकला. खरच घंटीवाचून शाळा म्हणजे प्राणावाचून शरीर… या घंटीचा नाद….तो कायम वाजत राहणार….
शाळेप्रति जीवन वाहून घेतले…💐💐💐💐💐💐
अप्रतिम लेख👌👌👌👌
Thanks to your best compliment
मॅडम तुम्ही खऱ्याखुऱ्या हाडाच्या शिक्षिका आहात. तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे… शाळेप्रती तुमचा जिव्हाळा अलौकिक आहे. सॅल्यूट तुम्हाला. तुमचे गुण आमच्यात पण येवोत. अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
मॅडम तुम्ही खऱ्याखुऱ्या हाडाच्या शिक्षिका आहात. तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे… शाळेप्रती तुमचा जिव्हाळा अलौकिक आहे. सॅल्यूट तुम्हाला. तुमचे गुण आमच्यात पण येवोत. अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
अप्रतिम लेखन.
खरंच…शाळा आणि घंटा यांचा अतूट संबंध.घंटा वाजली शाळेत जा,अशी लस्हानपणी आई म्हणायची.लेख वाचून लहानपण आठवलं.
अतिसुंदर,शब्द रचना, अनुभवायचे हे लेखन वाचकांना व नवीन लेखन करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी. . प्रत्येकानी हा लेख वाचावा.
मॅडम,आपण आपल्या कामाचं वास्तविक सार या लेखातून रेखाटले आहे, खरंच खूप छानच !…..,👌👍💐
Thanks to your compliments
Very nice article 👍
Thaku mam
मँडम प्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन.खरचं प्रत्येक कामाची मांडणी तुम्ही किती वेगळ्या पद्धतीने करता, जेणेकरून इतरांना ही नवचैतन्य देणारी कृती असते.म्हणून तुमच्या विषयी असं वाटतं यशस्वी लोकं वेगळं काही करत नाहीत,पण प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
खुप छान लेख लिहिलाय मॅम, अगदी वास्तववादी ! अंतःकरणपूर्वक अभिनंदन.
आपल काम अवर्णनीय आहे .आपल्या कामाला बघुन मलाही नवीन उर्जा मिळते . खूप सुंदर शब्दबध्द केलत .