बीड रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन कडून नाच ग घुमा, श्रावणसरी बहारदार कार्यक्रम संपन्न……
बीड रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन कडून सर्व महिलांसाठी विशेषतः सर्व रोटरीयन महिला आणि अँन्स साठी 'नाच ग घुमा,श्रावणसरी' हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. असा हा महिलांसाठीचा कार्यक्रम आयोजित होणं हे रोटरीच पहिलंच वर्ष होतं. रोजच्या कामाच्या व्यापातून,धकाधकीच्या जीवनामधून महिलांना स्वतःला आनंद मिळावा आणि स्वतःमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना एक संधी मिळावी, यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीड रोटरीने केले होते. आणि त्यासाठी अगदी महिलांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहभागही नोंदवला.
यामध्ये रोटरियन्स महिला या आपले कर्तव्य बजावून ठरलेल्या कार्यक्रमासाठी वेळ काढून एकत्र जमून दररोज संध्याकाळी दोन तास गाण्याची प्रॅक्टिस करत होत्या. नियोजित कार्यक्रम हा उत्कृष्ट कसा होईल यासाठी प्रत्येक महिला हिरीरीने सहभाग घेत होत्या.आपलं सादरीकरण उत्तमोत्तम होण्यासाठी तयारी करत होत्या.कोरिओग्राफरच्या मार्गदर्शनाखाली सुंदर गीतांचा सरावही सुरू होता.या सर्व नियोजनासाठी रोटरी क्लब ऑफचे अध्यक्ष रो. नितीनजी गोपन आणि रो. डॉ. निलेशजी जगदाळे सर सर्व हव्या असलेल्या बाबी पाहत होते.
या कार्यक्रमासाठी गणेश वंदना, गीत गायन, नाच ग घुमा,उपस्थित महिलांसाठी खेळ, उखाणे आणि श्रावणा मध्ये साजरे होणाऱ्या सर्व सणावर आधारित म्हणजे नागपंचमी, राखी पौर्णिमा, स्वातंत्र्य दिन,श्रीकृष्ण जन्माष्टमी,गणेशोत्सव या सर्व सणांवर आधारित असणारं आणि समाजात एक सकारात्मक संदेश देणाऱ्या विविध गीतांचा आणि उपक्रमांचा समावेश होता.
या कार्यक्रमांमध्ये सादरीकरणासाठी रो.सौ.उषा ढेरे रो. श्रीमती आशा भारती,रो.सौ.अनिता शिंदे, रो. सौ.संगीता मनसबदार, रो.सौ.संगीता सपकाळ,रो.शैलजा ओव्हाळ,सौ.सोनिका जगदाळे, सौ. मनीषा देशमाने, सौ. वर्षा थोरात, सौ.अनिता भोसले,आणि उत्कृष्ट सादरीकरण करणारी चिमुरडी कु. नक्षत्रा जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरुवात रो. सौ उषा ढेरे आणि रो. आशा भारती यांच्या गणेश वंदना नृत्य सादरीकरणाने झाली. त्यानंतर सौ.सोनिका जगदाळे, नक्षत्रा जगदाळे आणि रो. अनिता शिंदे यांनी पारंपारिक असा 'नाच ग घुमा'या नृत्याचे सुंदर सादरीकरण केले. त्यानंतर रो.संगीता सपकाळ रो.संगीता मनसबदार रो.आशा भारती रो. उषा ढेरे सौ.रेखा संघानी,सौ. मचाले मॅडम,यांनी आपल्या श्रावणातील सणावर आधारित सुमधुर गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. उपस्थित महिलांनी सुंदर खेळही सादर केले आणि सुंदर सुंदर उखाण्यांनी तर कार्यक्रमाला रंगतदार बहारच आणली.
सर्व कार्यक्रमाचे सार आणि समाजामध्ये 'झाडे लावा, झाडे जगवा', 'माझं झाड,माझं बाळ'असा संदेश देणार तसेच 'भारत की हर एक बेटी भारत माता है,उसका सन्मान करो' असा सुंदर सकारात्मक संदेश देणारं सर्व समावेशक, श्रावणातील सर्व सणावर आधारित असणारं गीत सर्व रो.महिलांनी सादर केलं ज्याला सर्व रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
अवघ्या दहा दिवसात या कार्यक्रमाची तयारी सर्व महिलांनी जोमदारपणे केली होती आणि अकराव्या दिवशी म्हणजे 24/8/ 2024 या दिवशी हा कार्यक्रम हॉटेल नीलकमल या ठिकाणी उत्कृष्टपणे, उत्कृष्ट नियोजनखाली आनंददायी वातावरणामध्ये पार पडला.श्रावणातील सर्व सणावर आधारित,विशेष म्हणजे पारंपरिकता जपणारा रोटरीचा हा श्रावणसरी कार्यक्रम एक आगळावेगळा उपक्रम ठरला.शेवटी उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल सर्व महिलांचा सन्मानही करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रज्ञाताई रामदासी उपस्थित होत्या. तसेच जेष्ठ महिला गुलाबताई लोळगे, मालतीताई गोपन,ललिताताई जगदाळे आवर्जून उपस्थित होत्या. तसेच रो. दिनेशजी लोळगे, रो. अतुलजी संघानी, रो. राहुलजी कुलकर्णी, रो. हरीशजी मोटवाणी, रो. नितीनजी भोसले, रो. डॉ. शिवाजी देशमाने, रो. भारतजी शेटे, रो. सूर्यकांतजी महाजन, रो.अरविंदजी निंबाळे, रो. प्रकाशजी मंत्री, रो. सर्वज्ञजी जोशी, रो. प्रकाशजी कोंका,रो.माणिकजी परभने,रो. बालाप्रसादजी वैष्णव, रो. संतोषजी पडोळे, रो. राजेंद्रजी गाडेकर,रो. लक्ष्मणजी मळेकर, रो.अमोलजी तळेकर, रो. अनिलजी कुकडेजा, रो.गंगाभीषण करवा, रो. निर्मलजी जैन, रो.डॉ.चैतन्यजी कागदे, रो.गणेशजी वाघ आणि गीतांजली क्लबचे सर्वेसर्वा आदरणीय विवेकजी काटे सर आणि सर्व रसिक श्रोते उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ मिडटाउनचे अध्यक्ष रो. नितीनजी गोपन, सचिव रो. डॉ. निलेशजी जगदाळे आणि सर्व टीमने परिश्रम घेतले. 'नाच ग घुमा, श्रावणसरी' या कार्यक्रमाचे बीड परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
शब्दांकन
श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे,
मुख्याध्यापिका, प्रा.शा.ढेकणमोहा
बीड
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्कृष्ट व बहारदार कार्यक्रम मॅडम👌👍