✍️८ मार्च महिला दिनाच्या माझ्या सर्व महिलांना भगिनींना समर्पित..✍️.
तू स्वयंसिध्दा….✍️
छाटले पंख तुझे जरी
डगमगली ना कधी कुणा,
कधी रडलीस,कधी लढलीस
सिध्द करण्या,उठलीस पुन्हा…||१||
नव्हतीस तू तुझी
ना माहिती तू तुला,
डोकावलेस आत जेंव्हा
कस्तुरी गवसली तुला…||२||
खेचण्या मागे कितीही
दिसले तुला जरी,
ना थांबली पुन्हा कधी
ना मागे पाहिले वळून तरी…||३||
चालताना तू पुढे
सोसले चटके किती,
आकाशी झेपावलीस तू
ना सोडली कधी निती…||४||
धैर्य तू,तूच शौर्याचे प्रतिक
तूच करुणा,सोशिकही तू,
दया,क्षमा,शांतीचे जरी प्रतिक तू
सिध्द करण्या अस्तित्व,चाल पुढेच तू..||५||
रचना
उषा बप्पासाहेब ढेरे
शिक्षिका,बीड
9420025078
✍️✍️✍️✍️👏👏👏🙏🙏🙏