आषाढी एकादशी…

आस…..

 

अक्षरांचे टाळ,शब्दांचा निनाद

मुखी एकच, ज्ञान-विठ्ठल…||१||

 

ध्यानी-मनी-स्वप्नी,एकच तो ध्यास

कर्म हाच नित्य, विठ्ठल माझा…||२||

 

मनोभावे पुजा,सदा कर्तव्याची

तीच पूर्ण व्हावी,आस विठ्ठला…||३||

 

मागणे एकच,आज एकादशी

सेवा लाभावी,विठ्ठला तुझी…..

 

अभंग रचना – उष:प्रकाश करपे/ढेरे,बीड

Leave a Comment