बालपण

बालपण

लहानपणी मोठं व्हायची
हौस असते भारी
कुणीही मोठं दिसलं की
मजा वाटते न्यारी…👌

ऐट मिरवतात मोठे सगळे
सदा मनात येई,
मी मोठा झालो की
कित्ती मजा येईल…😇

होता होता एकदा
झालो मी मोठा,
वाटले आता आपलाच रुबाब
पण मनाचा भ्रम खोटा..🤦‍♀️

काय ते काम
अन् काय त्या कटकटी,
सगळं सोडवताना नुसता
जीव येई मेटाकुटी..😌

सगळं करता करता
आयुष्य पुढे जाते,
पण तरीही प्रत्येक कामात
आनंद घेत जगता येते..🙂

जीवनात खर तर
मानला तर आनंद आहे,
नाही तर क्षणोक्षणी
बदलता मेळ आहे..✍️

पण एक सांगू
कितीही गुंता झाला
तरीही बालपण जगायचं,
अन् पदोपदी खुश राहून
इतरांनाही हसवायचं…😊

✍️👆उषा ढेरे,बीड✍️👆

Leave a Comment