स्वातंत्र्यदिन..एक सोहळा.

आज १५ ऑगस्ट २०२४,स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
प्रा.शा.ढेकणमोहा,बीड शाळेत १३ /८/२४ ते १५/८/२४ या तीन दिवस ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले.
आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांनी झेंड्यासाठी घोषणेची जोरदार तयारी केली होती.सकाळीच घोषणा देत,ढोल वाजवत फेरीची तयारी करत होते.चिमुकल्या चेहऱ्यावर उत्साह,मनात देशभक्ती ओतप्रोत भरलेली दिसत होती.प्रत्येकजण झेंड्यासाठी तयारीला लागला होता.येणार प्रत्येकजण तयारीसाठी मदत करत होता.आम्ही शाळेत दोघीच असल्याने सर्व तयारी आधीपासून करावी लागते.मला फलक लेखनाची आवड असल्याने स्वातंत्र्य दिनाचे फलकलेखन करून फलक बोर्ड मुलांनी सकाळीच बाहेर आणला होता.पताकांनी मैदान सजले होते.मुलांचे हात तिरंगी रबरने तिरंगी झाले होते.बऱ्याच मुली/ मुलांनी आपल्या फ्रॉक, शर्टवर तिरंगी पिना सुध्दा लावल्या होत्या.याचाच अर्थ सर्व वातावरण तिरंगामय झाले होते.आम्ही सर्व आटोपून फेरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाकडे ध्वजारोहण साठी ढोल वाजवत,घोषणा देत,सर्व मुलांना घेऊन निघालो.सोबत सरपंच ,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष,सदस्य,गावकरी सर्व उपस्थित होते.तिथे माध्यमिक शाळेतील शिक्षक,विद्यार्थीही लेझीम,वेशभूषा करून आली होती. प्रत्येक झेंड्याला आम्ही एकत्र येतो.तिथे झेंडावंदन झाल्यानंतर आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण कार्यक्रमासाठी परत येतो.तिथे जेवढे ग्रामस्थ,पालक,नागरिक उपस्थित असतात तेवढे आमच्या शाळेकडे येतात. नेहमीप्रमाणे सर्वजण शाळेत आले. शाळेतील ध्वजारोहण मुख्याध्यापक या नात्याने माझ्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत गायन, करून झेंड्याला सलामी देवून,घोषणा देत झेंडावंदन करण्यात आले. मुलांनी एका सुरात महाराष्ट्र गीत गायन केले.त्यानंतर आमच्या शाळेतील १ ली ते ४ थी च्या जवळपास २५ ते ३० विद्यार्थ्यांनी कुणी भाषणे,कुणी देशभक्तीपर गीते,कुणी शेर तेही कुणी मराठीत तर कुणी इंग्रजीत सादर केले तेही आत्मविश्वासपूर्वक.मुलांची भाषणे झाल्यानंतर माता पालक यांची मनोगतं झाली.
मी या ध्वजारोहण प्रसंगी माता पालक/पालक यांना संबोधून,मुलांचा घरी अभ्यास घ्यावा,आपलं मूल आपल्यासाठी सर्वात जास्त कसं महत्त्वाचं आहे, त्यासाठी आपण त्याला किती आणि कसा वेळ द्यायला हवा,fln अंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याविषयी वर्ग १ ली ते ३ री वर्गातील विद्यार्थ्याना भाषा आणि गणित या विषयामध्ये नेमक्या कोणत्या क्षमता प्राप्त असाव्यात किंवा असल्या पाहिजेत हे अगदी उदाहरण देवून सविस्तरपणे माता पालकांना समजावून दिले.आजपर्यंत fln अंतर्गत येणाऱ्या idea व्हिडिओचा आपल्याला कसा फायदा झाला? आपण आपली कल्पकता वापरून मुलांचा सर्वांगीण विकास सहजपणे कसा साधू शकतो हे अगदी तळमळीने सांगितले.हे माझ्या मनोगतातून मार्गदर्शन केले.मागील सलग तीन वर्षापासून शाळेतली विद्यार्थी MTS राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेसाठी बसतात.त्यासाठी आम्ही शाळेतच तयारी करून घेतो.त्यामध्ये सलग दोन वर्षी माझा विद्यार्थी आदित्य जनार्दन पिसाळ याने बीड जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा देवून गुणवत्ता यादीत आपल स्थान कोरलं.त्याबद्दल त्याचा ग्रामसेवक तांदळे साहेब आणि ग्रामपंचायतने त्याला ५०१ रू.देवून सन्मान केला. ही बाब आमच्यासाठी खरच खूप गौरवास्पद आहे.त्यानंतर नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा शाळेकडून शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.तसेच Fln, निपुण महाराष्ट्र अंतर्गत उपस्थित सर्व माता पालक यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.त्यांनीही त्यांच्या मनोगतातून स्वतःचे अनुभव सांगितले. माता पालक गटामुळे स्वतः मध्ये आणि मुलांमध्ये झाले बदल सांगून आमचे आणि निपुण महाराष्ट्रचे आभार मानले. स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण आणि इतर सर्व कार्यक्रम तीन तास कार्यक्रम चालला. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा ढेरे मॅडम, सहशिक्षिका जायभाये मॅडम,सरपंच आणि उपसरपंच ताई, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सदस्य, अंगणवाडी ताई,कार्यकर्ती, माता पालक/पालक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि समस्त ढेकणमोहा ग्रामस्थ उपस्थित होते.
असा एकूणच राष्ट्रगीत गायन, महाराष्ट्र गीत गायन, नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थी सन्मान,माता पालक मनोगत आणि त्यांचा सन्मानपत्र देवून सन्मान सोहळा आयोजन,विद्यार्थ्यांची भाषणे असा भरगच्च कार्यक्रम घेण्यात आला.त्याची काही क्षणचित्रे…

1 thought on “स्वातंत्र्यदिन..एक सोहळा.”

  1. अतिशय सुंदर……. जाज्वल्य देशभक्तीचे
    भरते आलेले दिसते. राष्ट्रप्रेमाचे बाळकडू मिळालेले हेच बालक या देशाचे मजबूत आधारस्तंभ होतील…..
    आपली मेहनत अन् सुलभन व पालकांना सहकार्य दिशादर्शन हे वाखाणण्याजोगे आहे…..
    आपली शिक्षणाप्रती तळमळ तर यातून दिसतेच यासोबतच पालकांनीही आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी जागरूक असावे, याकरिता शासनस्तरावरून FLN, निपुन भारत, इ. बाबत प्रयत्न… पालक, गावकरी, पदाधिकारी, सदस्य, व इतर समाजघटकाचे शाळेला सहकार्य मिळविण्याची आपली हातोटी निश्चितच सर्वांना शाळेप्रती आपुलकी वाढविणारी आहे…….
    ताईसाहेब, आपण एक आदर्श शिक्षिका आहात व आमच्यासारख्या नवशिक्षकांकरिता प्रेरणादायी आहात…..

    जगातील सर्वात मोलाच्या कार्यांपैकी एक असलेले ज्ञानदानाचे कार्य म्हणजेच एक वसा…. इतरांना शहाणे करण्याचा…… हेच आपले महानत्व….

    आपल्या कार्यास सदिच्छा.

    Reply

Leave a Comment