जाणतो तो गुरु..

ही माझी ३ री वर्गात शिकणारी गौरवी…

अतिशय प्रामाणिक, हुशार, अभ्यासू आणि सर्वगुणसंपन्न अशी.नियमित वेळेवर दररोज शाळेत हजर असणारी गौरवी काल शाळेत दिसली नाही. ती घरी राहिली त्याला कारणही तसेच असेल हे माझ्या लक्षात आलं कारण ती घरी रहातच नाही.गौरवी शाळेत का बर आली नाही असं मी विचारल्यानंतर मला कळालं की तिची आई आजारी होती आणि आईबरोबर ती दवाखान्यात गेली होती. ती वर्गात नसली की वर्गात सुद्धा अगदी काहीतरी कमी आहे असं वाटतं.
आज नेहमीप्रमाणेच गौरवी शाळेत आली आणि दररोजच्या प्रमाणेच शाळा वर्ग सुरू झाले. उजळणी, पाढे, इंग्रजी शब्द, उजळणीचे अंकात आणि अक्षरात लेखन हे सर्व ज्यांचं करून होईल त्याचे लगेच मी मराठी वाचन घ्यायला सुरुवात केली. तसं गौरवीचा संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर तिचाही वाचण्यासाठी नंबर आला. अगदी अस्खलित, सुस्पष्ट, अचूक, आरोह-अवरोहयुक्त,विरामचिन्हांचा वापर करून वाचणारी गौरवी आज जरा अधून मधून मध्येच चुकत होती. चुकली की परत तोच शब्द वाचत होती. तिच्या वाचनाचं मी निरीक्षण करत होते. तिच्या चेहऱ्यावर मला काहीतरी जाणवत होतं. मी नेहमीच मुलांशी गप्पा आणि त्यांच्याबरोबर बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. त्याच सवयीमुळे गौरवीला वाचन करत मी मध्येच थांबवलं आणि विचारलं, बाळ, आज वाचनामध्ये तुझं लक्ष नाही. खर आहे की नाही? माझ्याकडे पाहून गौरवी नुसतीच हसली पण मनात तिच्या काहीतरी चाललं होतं हे मला कळालं हे तिच्याही लक्षात आलं. तेव्हा तिला मी आईच्या तब्येतीविषयी विचारलं तेव्हा तिने मला सांगितलं. तिच्या मनात चाललेली घालमेल पाहून माझ्याही डोळ्यात नकळत पाणी आलं.आम्ही दोघींनी बऱ्याच गप्पा मारल्या.तिच्याकडे पाहून तिच्या मनात चाललेली घालमेल मलाही संवेदनशील बनवून गेली होती.आई आजारी असल्यामुळे तिचं मन लागत नव्हतं.विचार मनात काहीतरी सुरूच होते. तिला समजावून सांगितल्यानंतर हसली आणि परत आमच्या प्रॅक्टिससाठी आनंदाने डान्स करू लागली.
खरंच मुलं किती संवेदनशील असतात. त्यांच्या मनातील भावना या फक्त जाणता यायला हव्यात. त्यांच्या विश्वात जाता यायला हवं.ते करता आलं की, आपल्याला मुलं अगदी मनमोकळेपणाने बोलतात आणि मोकळं होतात. मुलांच्या मनातील जाणून घेण्यासाठी खरोखर शिक्षकांना जाणकार व्हावं लागतं. एकदा का जाणकार झालं की कोणत्या मुलाला काय पाहिजे कोणत्या वेळेला हवा आहे किंवा ते कशासाठी हवं आहे, हे जाणून घेणं सोपं होतं. आज गौरवीशी बोलून तिच्या मनात चाललेली तिच्या आई बद्दलची घालमेल आणि तिचं झालेलं हळवं मन, माझं मनही हळवं करून गेलं. आईबद्दल आईच्या आजारपणाबद्दल बोलल्यानंतर अगदी तिला पटकन मिठीत घेऊन तिला आपलंसं केलं. मुलांच्या विश्वात जाणं तितकं सोपं नाही परंतु कठीणही नाही, फक्त मुलं आपल्याला ओळखता यायला हवीत. एकदा का मुलं आणि आपण यामधील अंतर कमी झालं की आपोआपच मनामधील अंतर कमी होतं आणि मग मुलं आपल्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलू लागतात आणि आपल्याशी समरस होऊन जातात.
तसंच अगदीच आज मला गौरवीला जाणून घेता आलं. तिच्या मनावरचं ओझं काही प्रमाणात का होईना मी कमी करू शकले याचं मला खूप समाधान आणि त्याहून जास्त आनंद. वाचन,लेखन आणि पुस्तकांच्या पलीकडेही मुलांचं खूप मोठं विश्व असत. त्या विश्वात ज्याला जाता येते तेच गुरु मुलांसाठी विश्व असतात आणि खूप आवडते सुद्धा. अगदी आज गौरवीबद्दल …….माझी गुणी गौरवी….

6 thoughts on “जाणतो तो गुरु..”

  1. खरोखर मनाला भिडणारी, अंतर्मुख करणारी गोष्ट आहे ही, गुरूने शिष्यांच्या अंतरंगात शिरून, त्याच्या मनाचा ठाव घेऊन, त्याला आपलेसे करून घेणे ही खूप अवघड कला आहे आणि उषा मॅडम आपण हे साध्य करून दाखवले, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐

    Reply
      • हे वाचून मॅडम मला माझ्या लहानपणीची आठवण आली, अगदी असच तुम्ही माझ्या मनात माझ्या चुलत्यानं बद्दल चालू असलेली भावना समजायचात….माझ्या लहानपणी माझ्या मनाच्या जवळ फक्त तुम्ही होतात मॅडम….🥰 मोठ्या माणसांना वाटत तिसरी/ चौथीची मुल लहान असतात त्यांना काही समजत नाही पण त्या वयात देखील ती खूप भावनिक असतात….खरच गरज असते त्यांचं मन ओळखण्याची…..खरच खूप भाग्यवान आहेत ते विद्यार्थी ज्यांना तुमच्या सारख्या गुरू मिळाल्या….❤️❤️❤️

        Reply
    • हे वाचून मॅडम मला माझ्या लहानपणीची आठवण आली, अगदी असच तुम्ही माझ्या मनात माझ्या चुलत्यानं बद्दल चालू असलेली भावना समजायचात….माझ्या लहानपणी माझ्या मनाच्या जवळ फक्त तुम्ही होतात मॅडम….🥰 मोठ्या माणसांना वाटत तिसरी/ चौथीची मुल लहान असतात त्यांना काही समजत नाही पण त्या वयात देखील ती खूप भावनिक असतात….खरच गरज असते त्यांचं मन ओळखण्याची…..खरच खूप भाग्यवान आहेत ते विद्यार्थी ज्यांना तुमच्या सारख्या गुरू मिळाल्या….❤️❤️❤️

      Reply

Leave a Reply to विवेक काटे Cancel reply