जिल्हा परिषद शाळेत चौथी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ संपन्न

प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथील चौथीच्या विद्यार्थ्याचा स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ

 

आज दि.२८/३/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा येथील २०२३-२४ च्या चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ संपन्न झाला.

चौथी वर्गाच्या अध्यापन विषयक केलेल्या नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांनी वर्ग १ ली/२ री/३ रीच्या विद्यार्थ्याना वेगवेगळ्या कृती,उपक्रम,खेळ,गणित,पाढे याच्या माध्यमातून आनंददायी पद्धतीने अध्यापन केले.त्यामध्ये विविध खेळ,गाणी,कविता,प्रश्नोत्तरे,पाठाचे वाचन इत्यादी कृतींचा समावेश होता.बाकी मुलांनी या आज स्वयंशासन दिनानिमित्त झालेल्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.आजच्या दिनी या एक दिवसीय शिक्षकांनी खूप छान वर्गाध्यापन केले.सर्व विद्यार्थ्यांनीही चौथीच्या या शिक्षकांना भरभरून प्रतिसाद दिला.सर्व अध्यापन विषयक तासिका संपल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका उषा ढेरे मॅडम यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्याना जिलेबी आणि फरसान असा खाऊ देण्यात आला.शेवटी चौथीच्या सर्वच विद्यार्थ्यांचा शाळेच्या उषा मॅडम,सुनीता मॅडम,सुलोचना मॅडम आणि इतर विद्यार्थ्यांनी शाल,श्रीफळ आणि स्वतः तयार केलेला पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.या सन्मान क्षणाचे सूत्रसंचालन तिसरीची विद्यार्थिनी समीक्षा शिंदे हिने केले.शेवटी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्याना निरोप समारंभ प्रसंगी भावी शैक्षणिक आयुष्यासाठी शुभाशिष देण्यात आले.

Leave a Comment