८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षिकानी १७ मार्च २०२४ रोजी महिला दिन आयोजित केला होता.यामध्ये महिलांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.बीड जिल्ह्यातील आपल्या प्रत्येक महिला भगिनीचा सन्मान व्हावा,कौतुक व्हावे हा एकच प्रांजल हेतू समोर ठेवून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.यामध्ये वैयक्तिक डान्स, ग्रुप डान्स, वेशभुषा,चारोळी,उखाणे, निबंध लेखन,नाटिका,गायन या सादरीकरणाचा समावेश होता.या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातील तब्बल २८६ महिलांचा समावेश होता.त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाचे कौतुक करण्यासाठी प्रत्येक महिला भगिनीला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात आली.हा अनोखा देखणा सोहळा तब्बल ७ तास चालला.या कार्यक्रमाला महिलांचा अतिशय उत्स्फूर्त सहभाग लाभला.या कार्यक्रमासाठी आयोजक म्हणून बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षिका,उषा ढेरे,सुमित्रा अडसूळ,संगीता सपकाळ,प्रतिभा शिनगारे,रंजना गायसमुद्रे,आशा भारती,उषा गव्हाणे, सुवर्णा सुतार,सुमन जोगदंड, वर्षा थिटे,विजयमाला पिंपळे,शिल्पा बडदे या सर्व महिला शिक्षिकानी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मान्यवर, श्रोतेजन,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.