विभागीय समन्वयक यांचा ढेकणमोहा मातांशी थेट संवाद

बीड:-आज दि.९/३/२४ रोजी निपुण महाराष्ट्र चे विभागीय समन्वयक श्री हाकाळे साहेब यांनी ढेकणमोहा माता पालक यांच्याशी मुलांच्या प्रगती विषयी चर्चा केली.बीड जिल्ह्यातून पायलट प्रोजेक्टसाठी दोन शाळा निवडलेल्या आहेत.त्यापैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा एक. त्या प्रॉजेक्ट अंतर्गत ऑगस्ट २०२३ मध्ये १ ली ते ३ रीच्या विद्यार्थ्यांची भावनिक,मानसिक,बौध्दीक,शारीरिक अश्या वेगवेगळ्या विकासावर आधारित विभागीय समन्वयक हाकाळे साहेब यांनी स्वतः प्रत्येक मुलांची पूर्व चाचणी घेतली होती आणि आता त्याच धरतीवर आधारित उत्तर चाचणी घेण्यासाठी साहेबांनी शाळेला भेट दिली.त्यासाठी आपल्या मुलांची वर्षाच्या शेवटी काय प्रगती झाली किंवा काय होणे अपेक्षित आहे.यावर चर्चा,संवाद,मार्गदर्शन करण्यासाठी १ ली ते ३ रीच्या सर्व माता पालकांना शाळेत बोलावले होते.त्या दरम्यान प्रत्येक मातेला त्यांच्या मुलांचे प्रगती कार्ड देवून त्यातील प्रत्येक प्रश्नावर सखोल चर्चा आणि प्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले.सुट्टीतही आपल्या मुलांकडून नेमका कोणता आणि कसा अभ्यास सहजपणे करून घ्यायचा हेही सांगितले.ज्यामुळे आपलं मुल हे भविष्यवेधी  शिक्षणासाठी कसं तयार होणार आहे हेही सांगितले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ढेरे मॅडम यांनीही मातांना या व्यतिरिक्त मुलांकडून करून घ्यावयाच्या सोप्या कृती कोणत्या याबाबतीत मातांना सांगून त्या कश्या करून घ्यायच्या हेही सांगितले.यावेळी शाळेतील शिक्षिका जयभये मॅडम आणि उंदरे मॅडम उपस्थित होत्या.खालील लिंक टच करून आपण व्हिडिओ पाहू शकता.

 

Leave a Comment