ढेकणमोहा शाळा,तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित

सलाम बॉम्बे फाउंडेशन कडून गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक शाळा तंबाखुमुक्त शाळा करण्यासाठी काही निकष ठरवून दिले आहेत.त्यामध्ये एकूण ९ निकषांचा समावेश आहे.यामध्ये विविध मुद्यांच्या आधारे हे निकष पडताळणी केली जाते.त्यामध्ये प्रत्यक्ष त्या त्या मुद्द्याची सत्यता प्रत्यक्ष दर्शी पडताळण्यासाठी त्या निकषावर आधारित फोटो अपलोड करावे लागतात.तो पुरावा योग्य असेल तर तो निकष पूर्ण झाला असे ऑनलाईन माहिती भरताना कळते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांनी त्या त्या मुद्द्याप्रमाणे निकष पूर्ण केल्यामुळे शाळेला  संस्थेच्या ट्रस्टी राजश्री कदम यांच्याकडून २०२४-२०२६ या वर्षासाठीच TOBACCO – FREE SCHOOL certificate देऊन गौरविले आहे.

Leave a Comment