आज दि.४/३/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा,बीड येथे निपुण महाराष्ट्र चे विभागीय समन्वयक आदरणीय नारायण हाकाळे साहेब आणि अजय इंगळे साहेब यांनी शाळेला भेट दिली.भेटीदरम्यान पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर आधारित १ ली ते ३रीच्या विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ पद्घतीने प्रत्येक विद्यार्थ्यांची लेखी,तोंडी,प्रात्यक्षिक स्वरूपात परीक्षा घेतली.यामध्ये विद्यार्थ्याना चित्र रंगवणे,गोष्ट ऐकून चित्र काढणे,संख्या वाचन,संख्या लेखन,बेरीज,वजाबाकी ,चित्र क्रमाने लावणे,क्रमाने चित्र लावून गोष्ट सांगणे,उतारा ऐकून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणे.चित्र पाहून भावना ओळखणे, फळ ओळखणे,रंग ओळखणे,प्राणी/पक्षी ओळखणे,दोरीवरील उड्या मारणे,लंगडी घालणे,सरळ रेषेत चालणे इत्यादी कृतींचा समावेश होता.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रतिसाद नोंदवला.विद्यार्थ्यांचा हा प्रतिसाद पाहून हाकाळे साहेब आणि इंगळे साहेब यांनी समाधान व्यक्त करून मुलांचे भरभरून कौतुक केले.