आज २८ फेब्रुवारी म्हणजे डॉ. सी व्ही रमण यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने नेहमीप्रमाणेच मुलांना मी फलकलेखनातून वैज्ञानिक रमण यांचे रेखाटन केले.सकाळी उठल्यापासून आपण विज्ञान कस जगतो ?रोजच्या दैनंदिन जीवनात विज्ञान किती महत्त्वाचे? त्याची वेगवेगळी उदाहरणें मुलांना दिली.काही सहज सोपे प्रयोगही करून दाखवले.मुलांना विज्ञानातील गमतीजमती सांगितल्या.मुलांनीही प्रयोग,कृतीचा आनंद घेतला. हे असेच का? ते तसेच का घडले? असे अनेक प्रश्नातून विज्ञान उलगडण्याचा प्रयत्न केला. फळ्यावरील रेखाटन पाहून मुलांनीही सी व्ही रमण यांचे सुंदर रेखाटन केले…..माझे बालवैज्ञानिक….