आज 14 जानेवारी…मकरसंक्रांत…. दिन विशेष
माझ्यासाठी विशेष दिन……
सगळ्या महिला अगदी सकाळपासूनच वानवसा देण्याला जायची,लगबगीने तयारी करत होत्या.माझी लगबग होती… पाठ घ्यायला जायची…. रस्त्याने जाताना प्रत्येक जणू काही आश्चर्याने पहात होता कारण आज मकर संक्रांत दिनी प्रत्येक महिला वानवसा देण्याच्या तयारीने घराबाहेर पडताना ही महिला मात्र पाठीला लॅपटॉपची बॅग अडकवून कुठे चालली असेल? मला मात्र आजच्या या माझ्या कामाचा खूप आनंद आणि उत्साह वाटत होता.







बीड येथे आज PMevidya channel साठी ई-साहित्य व्हिडिओ निर्मितीसाठी 5 वी वर्गासाठी गणित विषयाचे कोन आणि अपूर्णांक या दोन घटकासाठी दोन पाठ घेतले…!
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या नियोजनानुसार व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली STARS प्रकल्पांतर्गत गणित विषयाच्या व्हिडिओ निर्मितीची जबाबदारी बीडकडे आहे.
इयत्ता पाचवीचा गणित विषयाचा ‘कोन आणि अपूर्णांक’ हा पाठ आज घेतला. कॅमेऱ्यासमोर अध्यापनाचा अनुभव नेहमीच आनंददायी असतो. ई-बालभारती दिक्षा आणि व्हर्च्युअल क्लासरूमच्या अनुभवाचा आज खूप उपयोग झाला.यापूर्वी पुणे येथे भाषा आणि ४ थी परिसर अभ्यास/इतिहास विषयासाठी योगदान देण्याची संधी मिळाली आणि आता पाचवीच्या गणित विषयासाठी गणित विषयासाठी ही संधी मिळाली.
विक्रम सारुक साहेब,सुलक्षणा पवार मॅडम आणि तानाजी जाधव सर यांच्या प्रेरणेने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडत आहे. मला ज्यांनी ही संधी मिळवून दिली त्या सर्वांचे खूप खूप आभार…
Very nice Madam
Proud of your excellent work 👏
Thanku sir