SCERT, पुणे बालभारती येथून दर तीन महिन्याला प्रसिध्द होणारे त्रैमासिक शिक्षणगाथा यामध्ये बीडच्या उपक्रमशील, तंत्रस्नेही, आदर्श शिक्षिका,उत्तम लेखिका, संवेदनशील कवयित्री आदरणीय उषा बप्पासाहेब ढेरे यांचा स्वानुभव असणाऱ्या सुंदर लेखाची संपादक साहेबांनी दखल घेऊन उत्कृष्ट मासिकामध्ये स्थान दिले.खरोखर मॅडम हा अनुभव प्रत्येकाने वाचवा असाच आहे. प्रत्येक मुल हे त्याच्या गतीनं कसं शिकतं,फक्त आपल्याकडे तितका संयम हवा.नक्कीच हवा तो परिणाम नक्कीच मिळतो हेच जणू या लेखातून शिकायला मिळते…प्रत्येकाने लेख अवश्य वाचून प्रतिक्रिया द्याव्यात..