Kid’s passion pre primary school,Beed येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय,आदर्श शिक्षिका श्रीमती उषा ढेरे मॅडम यांना Foundation Day निमित्त प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केलं होत. या निमित्ताने उषा ढेरे मॅडम यांनी विद्यार्थी आणि उपस्थित माता पालक यांना भाषणातून मार्गदर्शन केले. माता जर मुलांविषयी सजग असेल तर नक्कीच मुलाचे भविष्य उज्ज्वल आहे. असंही त्या म्हणाल्या. मूल घडवताना आपण आदर्श माता कस असलं पाहिजे,त्यासाठी मुलांसाठी माता किती महत्त्वाची आहे हेही मॅडमने सांगितले. स्वतःच्या अनुभवातून,नवनवीन उपक्रम आणि माता पालक कार्यशाळा यातून आपलं मूल नेहमी आनंदी आणि सक्रीय कसं राहील हेही वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितले. मूल आनंदी राहिलं तर त्याच्याकडून होणारी प्रत्येक कृती ही नक्कीच यशस्वी होते.त्यामुळे मुलांच्या आहार,विहार,व्यायाम,झोप या सर्व गोष्टींकडे मातांनी लक्ष देणं आवश्यक आहे.असेही मॅडमने उपस्थित मातांना आवर्जून सांगितले.शाळेच्या या वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या संस्थापक/अध्यक्ष श्रीमती वर्षा केंडे मॅडम यांनी या प्रसंगी उषा ढेरे मॅडम यांनी शॉल,श्रीफळ आणि ट्रॉफी देवून सन्मान केला.त्याबद्दल मॅडमने केंडे मॅडमचे मनापासून धन्यवाद मानले.